शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

दोनशे राजकीय पक्ष कागदोपत्री

By admin | Published: December 22, 2016 1:05 AM

कागदोपत्री असलेल्या दोनशे राजकीय पक्षांच्या निधीबाबत चौकशी करावी, यासाठी निवडणूक आयोग प्राप्तिकर विभागाला लेखी

नवी दिल्ली : कागदोपत्री असलेल्या दोनशे राजकीय पक्षांच्या निधीबाबत चौकशी करावी, यासाठी निवडणूक आयोग प्राप्तिकर विभागाला लेखी पत्र देणार आहे. काळा पैसा पांढरा करण्यास तर हे राजकीय पक्ष स्थापन करण्यात आले नाहीत? त्यासाठी वापर केला जात नाही ना? असा संशय आयोगाला वाटतो. निवडणूक न लढविणाऱ्या दोनशेहून अधिक पक्षांना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या यादीतून वगळले आहे.यापैकी बव्हंशी राजकीय पक्ष कागदोपत्रीच असून, लोकांकडून काळ्या पैशात देणगी घेऊन पांढरा करण्यासाठी हे पक्ष मदत करीत असावेत, असा निवडणूक आयोगाला संशय आहे. २००५ पासून निवडणूक न लढविणाऱ्या अशा दोनशेहून अधिक राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या यादीतून वगळले आहे. निव्वळ कागदोपत्री असलेल्या राजकीय पक्षांची यादीच निवडणूक आयोग येत्या काही दिवसांत आयकर विभागाकडे सुपूर्द करणार आहे. जेणेकरून काळा पैसा पांढऱ्या करण्यात हे राजकीय पक्ष आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायद्यातहत कारवाई केली जावी. निवडणूक आयोगाला असला तरी निवडणूक कायद्यातहत कोणत्याही पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार नाही. हा अधिकार मिळावा, यासाठीचा प्रस्ताव मंत्रालयाकडून प्रलंबित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) सात पक्षांना १०२ कोटींची देणगीभारतातील सात राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांना २०१५-२०१६ वर्षात १०२ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. राजकीय पक्षांना निनावी देणगीदारांकडून २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी घेता येत नाही. सात राजकीय पक्षांना १,७४४ देणगीदारांकडून हे १०२ कोटी मिळाले. सर्वांपेक्षा तीनपट देणगी भाजपाला भाजपला ६१३ देणगीदारांकडून जास्तीतजास्त ७६ कोटी रुपये मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाकप, माकप आणि तृणमूल काँग्रेसने जी देणगी मिळाल्याचे जाहीर केले आहे त्याच्या तीनपट देणगी एकट्या भाजपला मिळाली.राजकीय पक्षांना २० हजार रुपयांपेक्षा जास्तीची देणगी आणि ती देणाऱ्यांची नावे सांगणे बंधनकारक आहे. काँग्रेसला २० कोटी रुपये ९१८ देणगीदारांकडून मिळाले. एडीआरने २००४ ते २०१५ पर्यंतच्या स्वतंत्रपणे केलेल्या विश्लेषणात राजकीय पक्षांना प्रामुख्याने रोख रकमेत देणगी मिळाल्याचे आढळले. ते प्रमाण ६३ टक्के एवढे होते. त्या तुलनेत २०,००० रुपयांपेक्षा काहीशी जास्त मिळालेली देणगी राजकीय पक्षांनी जाहीर केली आहे. त्यातून हेच दिसते की बहुतेक देणग्या या अज्ञात मार्गांनी मिळतात.यावर्षी राष्ट्रीय पक्षांच्या एकूण देणगीमध्ये ५२८ कोटी रुपयांची घट झाली. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात जेवढी देणगी त्यांना मिळाली त्यातुलनेत ही घट ८४ टक्के आहे. २०१४-२०१५ मध्ये राष्ट्रवादीला ३८ कोटी मिळाले होते त्यात तब्बल ९८ टक्क्यांची घट झाली. भाजपला २०१४-२०१५ वर्षात ४३७ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती ती २०१५-२०१६ मध्ये ८२ टक्क्यांनी कमी होऊन ७६ कोटींवर आली.