केरळच्या पूरग्रस्तांसाठी 'हमाल' बनलेत हे दोन आयएएस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 09:08 PM2018-08-20T21:08:02+5:302018-08-20T21:24:56+5:30

कोणी भर पाण्यात उभे राहून करतेय मदत, तर कोणी स्वत:चे लग्न बाजुला ठेवून मदतीला धावलेय

Two IAS officers who became 'hamal' for Kerala flood victims | केरळच्या पूरग्रस्तांसाठी 'हमाल' बनलेत हे दोन आयएएस अधिकारी

केरळच्या पूरग्रस्तांसाठी 'हमाल' बनलेत हे दोन आयएएस अधिकारी

Next

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये आलेल्या जलप्रलयाला जगभरातून मदत होत असली तरीही ही मदत पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासत आहे. यामुळे येथील काही आयएएस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गर्व न राखता चक्क हमाल बनत तांदळाची पोती आपल्या खांद्यावरून उतरवून ठेवत माणुसकी दाखवून दिली आहे. सोशल मिडीयावर या दोन आयएएस अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.



 

एका मराठमोळ्या लेफ्टनंट कमांडरने जीवाची पर्वा न करता हेलिकॉप्टर घराच्या छतावर उतरवून 23 जणांचे प्राण वाचविल्याची घटना ताजीच असताना आता या आयएएस अधिकाऱ्यांची माणूसकी भाव खाऊन जात आहे. वायनाडचे जिल्हाधिकारी जी. राजामनीकियम आणि उप जिल्हाधिकारी एन.एस.के. उमेश यांनी आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करत तांदळाच्या गोण्या पाठीवरून उचलून कार्यालयामध्ये ठेवल्या. 



 

आणखी एक इदुक्की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जीवन बाबू हे कँपमध्ये लोकांना जेवण वाढत आहेत. तर केरळच्या आपत्ती निवारण खात्याच्या अधिकारी अंजली रवी या त्यांच्या लग्नाची तयारी सोडून पूरग्रस्तांची मदत करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. अंजली यांचे लग्न गेल्या शनिवारी होणार होते. 
 

केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र राबत आहेत. मात्र, पूर संकटच एवढे मोठे आहे की, राज्याचा कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांचे फोटो आयएएस असोसिएशनने ट्विटरवर पोस्ट केले आहेत. देशभरातून या दोन्ही अधिकाऱ्यांचे कौतूक होत आहे. 
 

Web Title: Two IAS officers who became 'hamal' for Kerala flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.