#UPDATE J&K: Two Army personnel, who were shot by terrorists in Kupwara, succumb to their injuries.— ANI (@ANI_news) July 12, 2017
गेल्या सोमवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने 7 भाविकांचा मृत्यू झाला. तर तीन पोलिसांसह 32 भाविक जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
त्याचबरोबर, दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक झाली होती. यावेळी नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.