ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणा-या दोन भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनियन नागरिकांनी हत्या केली असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
' युक्रेनच्या उझगोर्ड वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणा-या भारतीय विद्यार्थ्यांवर १० एप्रिल रोजी तीन युक्रेनियन नागरिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रणव शांडिल्य आणि अकुंर सिंग या दोघांचा मृत्यू झाला असून इंद्रजीत चौहान हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौहान याने दिलेल्या जबाबानुसार, युक्रेनमधील पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिली. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांशी दुतावासातील अधिका-यांनी संपर्क साधला आहे, असेही त्यांनी सांगितले.
किव्ह येथील आमच्या दूतावासातील अधिकारी पोलिस, तसेच युनिव्हर्सिटीच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
In an unfortunate event,3 Indian students in Uzhgorod Medical College(Ukraine) were stabbed by 3 Ukraine nationals on 10 April: MEA— ANI (@ANI_news) April 11, 2016
Pranav Shaindilya and Ankur Singh died while Indrajeet Chauhan is recuperating,based on his statement Ukraine police apprehended accused:MEA— ANI (@ANI_news) April 11, 2016
Our Embassy in Kiev is ascertaining facts from police,university and local contacts.Embassy spoke to families of the deceased: MEA— ANI (@ANI_news) April 11, 2016