शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अतिरेकी हल्ल्यात दोन जवान शहीद, दोन अतिरेकीही ठार; तोयबाशी संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:28 AM

काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय हवाई दलाचे दोन जवान हुतात्मा झाले.

श्रीनगर : काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय हवाई दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. मिलिंद किशोर खैरनार व निलेश कुमार अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे हवाई दलाच्या गरुड पथकाचे कमांडो होते.हाजिन भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या भागाभोवती वेढा घातला. गरुड पथकातील जवानांना अनुभव व प्रशिक्षणाचा भाग म्हणून या आॅपरेशनमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. सुरक्षा दलांनी वेढा घालताच, अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात दोघे जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना, त्यांना वीरमरण आहे. मात्र दोन्ही दहशतवाद्यांचा खातमा करण्यातही सुरक्षा दलांना यश आले.अली उर्फ अबू माझ व नसरुल्ला मीर अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. हे दोघे लश्कर-ए-तोयबाचे असून, अबू माझ हा पाकिस्तानी नागरिक आहे व नसरुल्ला मीर हा स्थानिक अतिरेकी आहे. हिज्बुल मुजाहिद्दिनच्या अतिरेक्यांना शस्त्रे पुरवण्याच्या आरोपावरून दोन पोलिसांना बुधवारी अटक करण्यात आली. त्या दोघांचा अतिरेकी संघटनेशी संबंध होता आणि त्यांनी संघटनेच्या अतिरेक्यांना शस्त्रसाठा पुरवला होता, असे तपासात आढळून आल्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. त्या पोलिसांकडेही शस्त्रसाठा सापडल्याची माहिती त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)गृहमंत्र्यांशी चर्चा-नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी आज दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील परिस्थितीशी माहिती दिली.भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात राहणाºया भारतीयांच्या समस्या लक्षात घेणे व त्यावर तोडगा काढणे यासाठी समिती नेमण्याबाबतही त्या दोघांमध्ये चर्चा झाली.

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिर