शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

काश्मीरमध्ये लष्करचे दोन अतिरेकी ठार, एकास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:50 AM

दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तैयबा’चे दोन अतिरेकी

श्रीनगर : दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तैयबा’चे दोन अतिरेकी ठार झाले तर तिसऱ्या अतिरेक्याने शस्त्र व दारुगोळ््यासह शरणागती पत्करली. सुरक्षा दलांच्या या कारर्वासविरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनेरस्त्यांवर येऊन दगडफेक सुरु केली. या हिंसक जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैमोह तालुक्यातील चिद्दर गावातील एका घरात अतिरेकी लपून बसले आहेत अशी पक्की खबर मिळाल्याने लष्कराचे जवान व पोलिसांनी त्या इमारतीस वेठा घातला. लपलेल्या अतिरेक्यांनी शरण येण्याऐवजी गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलांनीही गोळीबाराने जोरदार प्रत्युत्तर दिले.सुमारे दोन तास चाललेल्या या कारवाईत इमारतीत लपलेले दोन अतिरेकी ठार झाले. त्यापैकी एक शकूर अहमद दर हा लष्कर-ए-तैयबाचा स्थानिक कमांडर होता.शाकीर अहमाद नावाच्या तिसºया अतिरेक्याने पळून जाणे अशक्य झाल्यावर शरणागती पत्करली. स्थानिक काश्मिरी युवक असलेला शाकीर दोनच महिन्यांपूर्वीअतिरेक्यांना जाऊन मिळाला होता, असे समजते.सुरक्षा दलांची ही कारवाई सुरु असताना स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर येऊन दगडफेक सुरु केली. त्या जमावास आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर, पेलेट गन व नंतर बंदुकांचा वापर केला.पोलिसांच्या गोळीबारात निदर्शकांपैकी यावर अहमद दर हा गस्सीपुरा येथील युवक गंभीर जखमी झाला. नंतर अनंतनाग येथील इस्पितळात त्याचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)मेहबूबा यांनी टष्ट्वीटरवर लिहिले की, आघाडी सरकारचा अ‍ॅजेंडा राम माधव यांनीच तयार केला होता व राजनाथ सिंग यांच्यासह भाजपाच्या नेतृत्वाने त्यास मान्यता दिली होती. आम्ही त्या अ‍ॅजेंड्याचे पालन केले. सत्तेत असताना भाजपाच्या एकाही मंत्र्याने त्याविषयी तक्रार केली नाही. मात्र आता त्या पक्षाने हात वर करून आमच्यावर खापर फोडावे हा तद्दन खोटेपणा आहे. आमच्यावर आरोप करण्याऐवजी भाजपाच्या मंत्र्यांनी आधी आपण स्वत: काय काम केले हे तपासून पाहायला हवे होते.