नवी दिल्ली : सराय काले खांवरू न मेरठपर्यंत जाणाºया ‘हायस्पीड ट्रेन’ने गाजियाबादमधून जवळपास दोन लाख प्रवासी प्रवास करतील. दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम लिमिटेड(डीआयएमटीएस)च्या सर्वेक्षणातून ही प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. या मार्गावर दररोज ७ लाख ५ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. अद्यापही सर्वेक्षण सुरू असल्याने प्रवासांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्राथमिक आकडेवारी असल्याने प्रवासी संख्येला अंतिम म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. मेट्रो, हायस्पीड ट्रेनपैकी कुणाला अग्रक्रम देणार? यासंबंधी प्रवासांची मते सर्वेत नोंदविण्यात आली. प्रवाशांनी मोठ्या संख्येत हायस्पीड ट्रेनला प्राथमिकता दिली. या ट्रेनच्या भाड्यासंबधी प्रवाशांमधे मात्र अनेक संभ्रम आहेत. मेट्रोतील तिकीट कमी असल्याने काही प्रवाशांनी मेट्रोला अग्रक्रम दिला, अशी माहिती नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट लिमिटेड (एनसीआरटीसी) च्या अधिकाºयांनी दिली. लवकरच अंतिम अहवाल येईल, असा विश्वास अधिकाºयांनी यावेळी व्यक्त केला.भाडेसंबधी लवकर होणार निर्णयहायस्पीड ट्रेनचे भाडे लवकरच ठरवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली आहे. मेट्रोप्रमाणे या ट्रेनचे भाडे ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. उच्च गुणवत्ता कोच तसेच सामान्य कोचचे भाडे वेगळे असेल. फ्रान्स तसेच स्पेनमधील कंपनी या प्रोजेक्टचे डिझाईन तयार करीत असल्याची माहितीही अधिकाºयांनी दिली.
दोन लाख प्रवासी करणार ‘हायस्पीड ट्रेन’ मधून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 4:45 AM