दिवाळीनिमित्त गावी जात असलेल्या प्रवाशांच्या बसला राजस्थानच्या सीकरमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामझ्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिकजण जखमी झाले आहेत. फ्लायओव्हरजवळ वेगाने वळवताना भिंतीला जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे.
तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये नर्सिंग विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळून ३० जण जखमी झाले आहेत. रस्त्यावरून मिनी बस घसरली आणि दरीत कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व जखमींना उधमपूरच्या सरकारी मेजिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानच्या सीकरमधील अपघात खूप भीषण आहे. बसने फ्लायओव्हरच्या टर्नवर वेगाने पलटी मारली आणि विंग वॉलवर जाऊन आदळली. बसमध्ये गर्दी असल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. १० प्रवाशांचा जागीत मृत्यू झाला होता. उर्वरित जखमींना लक्ष्मणगड आणि सीकरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांचा हॉस्पिटलला नेताना वाटेतच मृत्यू झाला आहे.
एका बाजुने बसचा चक्काचूर झाला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी थांबून मदतकार्य सुरु केले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मदतकार्य सुरु केले.