नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे कायम ठेवण्याचे संकेत पंतप्रधानांनी शनिवारी दिले. ‘जान है, तो जहान है’ हे सरकारचे बोधवाक्य होते मात्र आता ‘जान भी, जहान भी’ हे बोधवाक्य असेल, असेही मोदी यांनी जाहीर केले पंतप्रधान मोदी यांनी २३ मार्च रोजी संध्याकाळी तीन आठवड्यांचे लॉकडाऊन जाहीर करताना सांगितले होते की, ‘जान है तो जहान है’ म्हणजेच, जीव वाचविणे ही सर्वोच्च प्राथमिकता असेल. मात्र, आज दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्याचा विचार करताना राज्य सरकारांची सहमती घेण्याकडे त्यांचा कल होता. ते म्हणाले की, ‘जान भी, जहान भी’ म्हणजेच, १५ दिवसांचे लॉकडाऊन हे सर्व ७२० जिल्ह्यांसाठी नसेल. हे १५ दिवसांचे लॉकडाऊन आंशिक असेल आर्थिक उलाढालीसाठी अधिकाअधिक क्षेत्र खुले करण्यासाठी योजना तयार करीत आहे.
लॉकडाउन वाढविला तरी देशांतर्गत रल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक बंदच राहणार आहे. लॉकडाउननबाबत रेड झोन - (१०० रुग्ण), यलो झोन - (२५ ते १०० रुग्ण) आणि ग्रीन झोन (रुग्ण संख्या तुरळक) करुन त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. रेड झोनमध्ये कडक निर्बंध असतील तर यलो झोनमध्ये तुलनेने कमी असतील, ग्रीन झोनमध्ये मात्र गरजेप्रमाणे शिथिलता दिली जाईल, असे मोदी यांनी सांगितले. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्से चर्चा केली.पंतप्रधान मोदी यांनी रुमालापासून हाताने बनवलेला मास्क परिधान केला होता.