श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या गोळीबारादरम्यान भारतीय लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला. तर यावेळी आणखी एक अधिकारी जखमी झाला. मात्र, या अधिकाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, ज्यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.