शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

काय सांगता? पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली अन् निर्णयही झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 16:27 IST

पोलीस ठाण्यात चक्क पोपटानं साक्ष दिली असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. पोपटांची ही साक्ष महत्त्वाची ठरली असून त्यानंतर निर्णयही झाल्याची घटना समोर आली आहे. 

जयपूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान अनेक अजब घटना समोर येत आहेत. अनेक जण आपल्या समस्या सोडवण्यासाठी अथवा तक्रारींसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतात. मात्र याच दरम्यान पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. पोपटांची ही साक्ष महत्त्वाची ठरली असून त्यानंतर निर्णयही झाल्याची घटना समोर आली आहे. 

राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात ही अजब घटना घडली आहे. एका लहान मुलाने दोन पोपट पाळले होते. लॉकडाऊनमध्ये ते दोन्ही पोपट उडून गेले होते. काही दिवसांनी लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर घरच्यांनी पोपटांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा एका महिलेने दोन्ही पोपट पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचं समोर आलं. मुलाने महिलेकडे पोपट परत करण्याची विनंती केली तर तिने नकार दिला. त्यानंतर चिमुकल्याने पोपटांसाठी थेट पोलिसांकडे धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, करण सेन असं मुलाचं नाव आहे. तो राजसमंद जिल्ह्यातील कुंवारिया गावचा रहिवासी आहे. त्याने दोन पोपट पाळले होते. एकाचं नाव होतं राधा तर दुसऱ्याचं होतं कृष्ण. लॉकडाऊनमध्ये एक दिवस हे दोन्ही पोपट उडून गेले. मात्र त्यावेळी त्यांचा शोध घेता आला नाही. नियम थोडे शिथिल केले तेव्हा घरच्या लोकांनी बाहेर शोध घेतला. दोन्ही पोपट एका महिलेने पकडल्याचं समजलं. तेव्हा पोपट परत द्या अशी महिलेला विनंती करण्यात आली पण तिने यासाठी नकार दिला.

करणने रडत रडत पोलिस ठाणे गाठले आणि एका महिलेने त्याचे दोन पोपट पकडले असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी महिलेला दोन्ही पोपटांसह पोलीस ठाण्यात बोलावलं. त्यानंतर पोपट कोणाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी पोपटांनीच त्यांचा मालक कोण याची साक्ष पोलिसांसमोर दिल्याची माहिती मिळते. करणने जेव्हा राधा कृष्ण अशी हाक मारली तेव्हा दोन्ही पोपट उडून त्याच्या खांद्यावर येऊन बसले. यावरूनच पोलिसांनी दोन्ही पोपट करणचे असून ते त्याला परत करावेत असं पोलिसांनी महिलेला सांगितलं. त्यानंतर महिलेने ते पोपट परत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : भयंकर! जेवणात आढळला विंचू; क्वारंटाईन सेंटरमधील धक्कादायक प्रकार

अमेरिकेत हिंसाचार सुरू; तब्बल 1400 जणांना अटक

"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"

CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video

CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक

CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र

CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिस