शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
2
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
6
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
7
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
8
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
9
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
10
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
12
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
13
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
14
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
16
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
17
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
18
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
19
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
20
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?

शरीराचे दोन तुकडे होऊनही त्याने केले अवयव दान!

By admin | Published: February 18, 2016 6:36 AM

रस्ते अपघातात शरीराचे दोन तुकडे झाल्याने एका तरुणाने तशाही अवस्थेत अवयवांचे दान करण्याची इच्छा व्यक्त करून पराकोटीच्या परोपकारी वृत्तीची प्रचीती दिली

बंगळुरू : रस्ते अपघातात शरीराचे दोन तुकडे झाल्याने एका तरुणाने तशाही अवस्थेत अवयवांचे दान करण्याची इच्छा व्यक्त करून पराकोटीच्या परोपकारी वृत्तीची प्रचीती दिली. डॉक्टरांनीही त्याचे दोन्ही डोळे गरजूंवर प्रत्यारोपण करण्यासाठी वेळीच काढून घेऊन त्याच्या अंतिम इच्छेचा यथोचित आदर केला. या दोन डोळ्यांनी किमान दोन अंधांना पुन्हा दृष्टीलाभ होऊ शकेल.अवयव दानाच्या प्रत्यक्ष कृतीच्या बाबतीत मात्र सार्वत्रिक औदासिन्य दिसून येते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील या तरुणाने मृत्यू समोर उभा ठाकलेला असतानाही प्रसंगावधान राखून दाखविलेले हे औदार्य एकूणच अवयवदानाच्या चळवळीस स्फूर्तिदायक आहे.बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत नोकरी करणारा २३ वर्षांचा हरीश नंजप्पा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुमकुरू जिल्ह्यातील गुब्बी या आपल्या मूळ गावी गेला होता. मंगळवारी सकाळी गावाहून बंगळुरूला परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर साखरेच्या पोत्यांनी भरलेला एक ट्रक मागून भरधाव आला व ओव्हरटेक करण्याच्या नादात हरीशच्या मोटारसायकलला ठोकरून पुढे गेला. दोन्ही वाहने वेगात असल्याने या धक्क्याने हरीश मोटारसायकलसह ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. या अपघाताचा आघात एवढा जबरदस्त होता की, हरीशच्या शरीराचे दोन तुकडे झाले. कमरेच्या खालचा भाग मोटारसायकलसह एका ठिकाणी उडाला, तर कमरेच्या वरचा शरीराचा भाग कित्येक फूट दूर जाऊन पडला.डोक्यावर हेल्मेट असल्याने डोक्याला मार लागला नाही व तशाही अवस्थेत हरीश शुद्धीवर होता. मागून येणारी काही वाहने तशीच पुढे निघून गेली. काही वेळाने इतर वाहनांमधील लोक कण्हणाऱ्या, विव्हळणाऱ्या हरीशला पाहून थांबले. महामार्गाचा तो पट्टा डोल रोड आहे. थांबलेल्या लोकांनी टोल कंत्राटदार कंपनीच्या आपत्कालीन सेवेच्या नंबरवर फोन केला. काही मिनिटांतच रुग्णवाहिका आली व हरीशला नजीकच्या इस्पितळात नेण्यात आले. दुर्दैवाने तेथे नेल्यावर थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)