पुद्दुकोट्टाई - तमिळनाडूच्या पुडुकोट्टईमध्ये रविवारी (20 जानेवारी) जलिकट्टू या पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. राम आणि सतीश अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. खेळात सहभागी झालेले असताना वळूने हल्ला चढवल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सर्वाधिक वळू मैदानात उतरवण्याचा विश्वविक्रम रचण्यात आला.
तमिळनाडूचे आरोग्य मंत्री विजयभास्कर यांच्या वतीने वीरालिमलई येथे या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये जवळपास 1,345 वळूंचा सहभाग नोंदवण्यात आला. ज्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे 424 स्पर्धकांनी या खेळात सहभाग घेतला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खेळात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.