नगरसेवकाकडून तरुणाला बेदम मारहाण जुन्या वादातून घडली घटना : गोलाणी मार्केटमध्ये दोन गट समोरा-समोर
By admin | Published: June 02, 2016 6:13 PM
जळगाव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या जुन्या वादातून गुरुवारी दुपारी बारा वाजता गोलाणी मार्केटमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली, वाद सोडविण्यासाठी आलेल्यांनीही एकमेकावर हाथ साफ केले. यात नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी किरण जोशी या तरुणाला बेदम मारहाण केली. फाटलेल्या कपड्यावर हा तरुण सैरावैरा पळत सुटला होता. दरम्यान, दोन्ही कडील ५० ते ६० जण एकमंेकावर चालून आले होते. या हाणामारीमुळे गोलाणीत तुफान गर्दी झाली होती.
जळगाव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या जुन्या वादातून गुरुवारी दुपारी बारा वाजता गोलाणी मार्केटमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली, वाद सोडविण्यासाठी आलेल्यांनीही एकमेकावर हाथ साफ केले. यात नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी किरण जोशी या तरुणाला बेदम मारहाण केली. फाटलेल्या कपड्यावर हा तरुण सैरावैरा पळत सुटला होता. दरम्यान, दोन्ही कडील ५० ते ६० जण एकमंेकावर चालून आले होते. या हाणामारीमुळे गोलाणीत तुफान गर्दी झाली होती. गोलाणी मार्केटमध्ये क्लास सुटल्यानंतर पार्किंगमधून दुचाकी काढत असताना दोन तरुणांमध्ये जुन्या वादातून शाब्दिक वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका तरुणाने मित्र किरण जोशी याला बोलावून घेतले. त्याने आल्या आल्या तरुणांना मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या तीन ते चार जणांनीही या तरुणांना बदडून काढले, त्यामुळे त्यातील एका तरुणाने नगरसेवक चेतन शिरसाळे यांना फोन केला असता शिरसाळे अवघ्या दहाच मिनिटात घटनास्थळावर पोहचले, त्यांनीही वाद न सोडविता किरण जोशी याला मारहाण करायला सुरुवात केली. प्रचंड गर्दी अन् पळापळदोन्ही गटातील ५० ते ६० जण समोरासमोर आल्याने यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. मार्केटमधील ही हाणामारी थेट मुख्य रस्त्यावर आल्याने पळापळ झाली होती. यात काही जणांनी दुचाकींमधील पेट्रोल काढून बाटल्या फेकण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.कारवाई शून्य..घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या तीन कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली, नंतर मारहाण करणार्यांची चौकशी केली, मात्र तक्रार कोणी देत नसल्याचे कारण पुढे करून या घटनेप्रकरणी कोणावरही कारवाई केली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावरदेखील पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. घटनेचे गांभीर्य व अशा घटनांना वचक बसावा यासाठी तरी हल्लेखोरांवर कारवाई करणे गरजेचे होते.