I.N.D.I.A. चा हात सोडून NDA ची गळाभेट घेत नितीश कुमार यांनी नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि बिहारमध्ये डबल इंजिन सरकारला सुरुवात झाली. हा भाजपच्या 2024 च्या यशाच्या दृष्टीने सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे. खरे तर हा भाजपची चौकडी अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांच्या उपक्रमाचे मोठे यश आहे.
खरे तर राजकारण असो वा कुठलेही एखादे मिशण त्यात काही लोक पडद्यामागे राहून आपली भूमिकाही बजावत असतात. बिहारमध्येही भाजपा आणि जेडियू यांची मैत्री घडून आणण्यात पडद्या मागे राहून काम करणाऱ्या अशाच दोन व्यक्तींची महत्वाची भूमिका आहे.
बिहार-झारखंडचे क्षेत्रीय संघटन महामंत्री नागेंद्र जी -नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमध्ये डबल इंजिन सरकार स्थापन होण्यात भाजपकडून मुख्य भूमिका, बिहार आणि झारखंडचे क्षेत्रीय संगटन महामंत्री नागेंद्र जी अर्थात नागेंद्र नाथ त्रिपाठी यांना मानले जात आहे. यापूर्वी ते बिहारचे संघटन महामंत्री होते. ते उत्तर प्रदेशातही आठ वर्षांपर्यंत संघटन महामंत्री राहिले आहेत.
बिहारच्या राजकारणात एनडीएच्या राजकारणाला बळकटी देण्याचे श्रेय नागेंद्र जी यांना जाते. मिशन 2024 साठी जेडीयूकडून जे प्रस्ताव त्यांच्याकडे आले, ते त्यांनी केंद्रीय रणनीतीकारांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. तसेच जेव्हा जेव्हा मतभेदाचा मुद्दा निर्माण झाला, तेव्हा- तेव्हा ती दरी भरून काढण्याचे कामही त्यांनी केले. आज सरकारमध्ये एनडीएची जी छबी दिसत आहे, ती त्यांनी जेडीयू नेते तथा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार केसी त्यागी यांच्यासमवेत तयार केला आहे.
जेडीयूचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी देखील उत्तर प्रदेशातून येतात. हे नितीश कुमार यांचे अत्यंत जवळचे आणि मुख्य रणनितीकारही आहेत. राजकारणाच्या पटावर, मुख्यत्वे युती अथवा आघाडीच्या राजकारणात निवडणुकांमध्ये भाग घेण्यासंदर्भात अनेक किंतु-परंतु असतात. हे सोडविण्यात केसी त्यागी यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. केसी त्यागी आणि नागेंद्र जी हे दोघेही उत्तरप्रदेशचे असल्याने त्यंचे ट्यूनिंगदेखील चांगले आहे.
भाजपचे बिहार आणि झारखंडचे क्षेत्रीय संगटन महामंत्री नागेंद्र नाथ त्रिपाठी आणि जेडीयूचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी.महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार स्थापन होण्यासाठी, जो काही अंतर्गत मसुदा तायर करण्यात आला तो या दोघांच्याही राजकीय परिपक्वतेचा परिपाक आहे. अंतिमतः भाजप आणि जेडीयूच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला मंजुरी दिल्यानंतर, बिहारमध्ये डबल इंजिन सरकार स्थापन होऊ शकले आहे.