शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

२१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन

By admin | Published: April 17, 2016 3:08 AM

फेसबुकच्या योग्य वापरामुळे तब्बल २१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन झाले आहे. मूळ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आणि सध्या येथील पत्र सूचना

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

फेसबुकच्या योग्य वापरामुळे तब्बल २१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन झाले आहे. मूळ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आणि सध्या येथील पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) ग्रंथालयात कार्यरत विजय नितनवरे (वय ४५) यांनी निराश न होता सतत आपल्या भावाचा शोध सुरू ठेवला होता आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांना त्यांचा भाऊ हंसराज मिळाला.३५ वर्षांचा हंसराज पुण्याच्या दिघी येथे वास्तव्याला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून तो भोसरीमध्ये एका कंपनीत कामाला आहे. विजय आणि हंसराज यांचे वडील पुरुषोत्तम नितनवरे वर्धेजवळील पुलगाव अ‍ॅम्युनेशन डेपोमध्ये कार्यरत होते. १९८२ साली त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा सर्वात लहान मुलगा हंसराज अवघा एक वर्षांचा होता. चार वर्षांनंतर त्यांच्या जागी पत्नीला डेपोत काम मिळाले. पुढे २३ मार्च १९९६ रोजी त्यांचीही जीवनयात्रा संपली. तेव्हा हंसराज इयत्ता दहावीत होता. पोरकेपणाच्या दु:खाने मानसिकदृष्ट्या खचला होता. हुशार विद्यार्थी असल्यावरही तो अनुत्तीर्ण झाला. भाऊबहिणीकडून आपल्याला जिव्हाळा मिळणार नाही या विचाराने त्याने २५ मे १९९६ रोजी घर सोडले. दरम्यान नैराश्याने ग्रासलेल्या हंसराजने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण सुदैवाने एका इसमाने त्याचे प्राण वाचविले. त्यानंतर स्वत:ला सावरत मुंबईत एका कंपनीत हेल्पर म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात घरातून पळून गेला असल्याने पुन्हा भावाबहिणीशी संपर्क करण्याचे धाडस त्याला झाले नाही. मुंबईत १० वर्षे राहून पुण्यात आला. तेथे लग्नही केले. दुसरीकडे मोठा भाऊ विजय आपल्या धाकट्या भावाच्या शोधासाठी अहोरात्र परिश्रम घेत होता. पोलीस ठाण्यांच्या खेटा घातल्या. छायाचित्र प्रसिद्ध केले आणि मग गुगलवर सर्च सुरू केला. त्यानंतर फेसबुकवर हंसराज नावाच्या लोकांना शोधणे सुरू झाले आणि अखेर त्याला त्याचा भाऊ ‘हंसराज’ मिळाला. विजयने त्याला पुलगावचा संदर्भ दिला तेव्हा त्याने ‘भाऊ मला क्षमा कर’ असे उत्तर दिले. या संदेशाने विजयच्या आशा पल्लवित झाल्या. त्याने फेसबुकवरच हंसराजच्या मित्रांशी संपर्क साधला. एक दिवस हंसराजने विजयला फोन केला आणि दोन भावांची पुन्हा भेट झाली.आपला धाकटा भाऊ जा जगात नाही हे मन मानत नव्हते. त्यामुळे सातत्याने त्याचा शोध सुरू ठेवला. चमत्कारांबद्दल ऐकले आहे; पण आता त्यावर विश्वास बसला.- विजय नितनवरेघरातून पळून जाण्याची घोडचूक केल्यावर पुन्हा भावाबहिणीसमक्ष जाण्याचे धाडस होत नव्हते. त्यांनी मात्र मला शोधण्यासाठी जिवाचे रान केले. अनेक वर्षांच्या वियोगानंतर मी त्यांना भेटत असून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. -         हंसराज नितनवरे