पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन बहिणींना अटक; आयएसआय एजंट असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 11:02 PM2021-05-23T23:02:29+5:302021-05-23T23:03:22+5:30
मध्य प्रदेशातील इंदौरमधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन बहिणींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
भोपाळ: कोरोना संकटाच्या काळातही भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणल्याचे पाहायला मिळाले. काश्मिरचा मुद्दा असो किंवा कोरोनाचा पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचे दिसत आहे. यातच आता मध्य प्रदेशातील इंदौरमधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन बहिणींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (two sister arrested in madhya pradesh by suspect in isi agents)
इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत असल्याचा या दोघींवर आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि महू सैन्य छावणीची माहिती पुरवत होत्या. या दोघी इंदौरच्या गवळी पलासिया भागात राहणाऱ्या आहेत.
शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा
पोलिसांनी चार दिवस पाळत ठेवली
या दोन बहिणींवरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सलग चार दिवस पाळत ठेवली होती. अखेर त्यांच्या संशयास्पद हालचाली वाढल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या दोघी जणी रस्त्यावरून जात असताना पाकिस्तानातील व्यक्तींशी बोलत होत्या. गुप्तचर विभागाने त्यांच्या फोनची फ्रिक्वेंसी पकडली आणि एकूण प्रकरणाचा उलगडा झाल्याचे सांगितले जात आहे.
केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला
पाकिस्तानी गुप्तहेरांशी वर्षभरापासून संपर्कात
दोन्ही बहिणींची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्याजवळ असलेले लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या दोघी पाकिस्तानी गुप्तहेरांशी वर्षभरापासून संपर्कात होत्या, अशी माहिती मिळाली आहे. या गुप्तहेरांशी संपर्कात राहण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर खोटी ओळख असलेली खाती तयार केली होती. संशय येऊ नये, यासाठी या दोघींनी चार महिन्यात चार सीमकार्ड विकत घेतली होती. त्यांना मॉरिशसमधून फंडिंग होत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानातील मोहसीन खान आणि दिलावर यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले असून, अटक केल्यानंतर गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलीस कसून तपास करत आहे.