ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीकडून दोन सराईत जेरबंद * पिस्तूले जप्त : तळेगाव दाभाडे येथील कारवाई
By admin | Published: September 26, 2015 7:27 PM
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन सराईतांना जेरबंद केले असून या दोघांकडून २ पिस्तूलांसह ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली. सतेज सुहास यावले (वय २९, रा. तळेगाव दाभाडे) ...
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन सराईतांना जेरबंद केले असून या दोघांकडून २ पिस्तूलांसह ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली. सतेज सुहास यावले (वय २९, रा. तळेगाव दाभाडे) आणि विनोद गोपाळ रोहिटे (रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गणेशोत्सव आणि बकरी ईद असल्यामुळे जिल्ह्यामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर बारीक नजर ठेवून कारवाईचे आदेश अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, सहाय्यक निरीक्षक होडगर, पोलीस हवालदार एस.ए. जावळे, एस.व्ही. जम, जगदाळे, आर.डी. मिरघे, सी.बी. बागेवाडी, सी.जी. वाघ, पोलिस नाईक डी.एम. बनसुडे, गणेश महाडिक आणि व्ही.जी. गाडे देहूरोड आणि तळेगाव दाभाडे परिसरात गस्त घालीत होते.आरोपी तळेगाव दाभाडे येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये दोन पिस्तूलांसह ९ काडतुसे मिळून आली. आरोपींची मोटारसायकलसह दोन तलवारी, एक सुरा, कोयता असा एकूण ८१ हजार ५५० रूपयाचा माल जप्त केला आहे. आरोपींवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावर अनेक गुन्हे दाखल आहेत.