५४ लाखाच्या गुन्ात दोन संशयितांना अटक
By admin | Published: July 20, 2016 11:49 PM
जळगाव: व्यापार्याच्या कारमधून ५४ लाखाची रोकड लांबवल्याच्या दाखल गुन्ात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवींद्र शिवाजी होळकर (रा.मालाड, मुंबई) व आशिष बन्सीलाल बागडे (रा.भुसावळ) या दोघांना मंगळवारी रात्री भुसावळ येथून ताब्यात घेतले. बुधवारी अटक करुन दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील होळकर हा आठ दिवसापासून भुसावळ येथे एका लॉजमध्ये वास्तव्याला आहे.
जळगाव: व्यापार्याच्या कारमधून ५४ लाखाची रोकड लांबवल्याच्या दाखल गुन्ात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवींद्र शिवाजी होळकर (रा.मालाड, मुंबई) व आशिष बन्सीलाल बागडे (रा.भुसावळ) या दोघांना मंगळवारी रात्री भुसावळ येथून ताब्यात घेतले. बुधवारी अटक करुन दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील होळकर हा आठ दिवसापासून भुसावळ येथे एका लॉजमध्ये वास्तव्याला आहे.अजिंठा चौकापासून काही अंतरावर सोमवारी कारचा काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्याची ५४ लाख रुपयाची रोकड लांबवण्यात आली होती. संशयित एचडीएफसी बॅँकेच्या तसेच अजिंठा चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. या घटनेनंतर तब्बल सहा पथके तपासकामी रवाना झाले आहेत. ही चौकशी सुरु असतानाच बॅग चोरीचा अल गुन्हेगार होळकर भुसावळ आठ दिवसापासून थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या पथकाला भुसावळात पाठविले असता होळकर लॉजवरच मिळून आला तर बागडेला घरुन ताब्यात घेण्यात आले. दोघंही संशयित रेकॉर्डवरील होळकर व बागडे दोघंही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. होळकर याने यापूर्वी जळगाव व मुंबईत कारमधून लांबवल्या आहेत. २०१५ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेनेच त्याला पकडले होते, त्यामुळे त्यांचा या घटनेशी संबंध आहे का? याची चौकशी करीत आहेत. भुसावळ रेल्वे न्यायालयात दाखल खटल्याच्या कामकाजासाठी भुसावळमध्ये आल्याचे होळकर सांगत असला तरी पोलीस त्याच्या प्रत्येक वक्तव्याची चौकशी करीत आहेत. मुंबई व दाक्षिणात्य राज्यातील नेल्लुर जिल्ात अशाच प्रकारचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे तेथील गुन्हेगार जळगाव व भुसावळमध्ये आले आहेत का?, होळकरचा त्यांच्याशी संपर्क आला का? याची माहिती काढली जात आहे. बागडे हा रेल्वेत पाकीटमारीत माहिर आहे, यापूर्वी त्यानेही बॅगा लांबवल्या असल्याचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी सांगितले.कोट...मालाड येथे एक पथक रवाना करण्यापूर्वी तेथील गुन्हेगार भुसावळात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळात सापळा लावून होळकरला ताब्यात घेण्यात आले. त्याचा या गुन्ात सहभाग आहे का? याची चौकशी केली जात आहे.-राजेशसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा