ऑनलाइन लोकमत
कच्छ, दि. १३ - भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून आयएसआयसाठी काम करणा-या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली.
आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. कच्छ जिल्ह्याची सीमा पाकिस्तानला लागून आहे. कच्छच्या खावडा गावात रहाणा-या दोन संशयितांच्या हालचालींवर एटीएसचे अधिकारी मागच्या वर्षभरापासून पाळत ठेवून होते. अखेर त्यांना बुधवारी अटक करण्यात आली. एटीएसने त्यांच्या घरातून एक पाकिस्तानी सीम कार्ड आणि मोबाईल जप्त केला आहे.