ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 13 - चलनात येणाऱ्या 500 आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची नक्कल करता येणार नाही, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात मात्र नव्या नोटा चलनात येऊन दोन दिवस उलटत नाही तोच त्यांची नक्कल करून बनावट नोटा चलनात येण्यास सुरुवात झाली आहे. कर्नाटकमधील चिकमंगळुर येथे शनिवारी दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
चिकमंगळुरमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कर्नाटक पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दोषी असलेल्यांची धरपकड सुरू केली आहे.
चिकमंगळुर येथील एपीएमसी यार्डमधील एका व्यापाऱ्याने या नकली नोटांसंबंधी माहिती पोलिसांना दिली होती. दरम्यान, दोन हजार रुपयांच्या खऱ्या नोटेची या नोटा ही फोटो कॉपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लोकांकडून शंभर किंवा दोन हजार रुपये देऊन खरेदी करत आहेत. त्यामुळे व्यापऱ्यांच्याही अडचणीत वाढ होत आहे.