शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

आता विमानतळ, विमानात नो क्लिक क्लिक; डीजीसीएकडून आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 4:14 PM

सुरक्षेसाठी नियमांत बदल; डीजीसीएकडून आदेश जारी

नवी दिल्ली: डीजीसीएनं हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार प्रवाशांना सरकारी विमानतळं आणि विमानात फोटो काढता येणार नाहीत. काही विशेष प्रकरणांमध्ये परवानगी घेऊन फोटो काढण्याची मुभा मिळू शकेल. त्यासाठी डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लिखित परवानगी आवश्यक असेल.डीजीसीएनं याबद्दल एक आदेश प्रसिद्ध केला आहे. 'एअरक्राफ्ट नियम १९३७ च्या नियम क्रमांक १३ नुसार कोणत्याही व्यक्तीला विमानतळ किंवा विमानात फोटो काढण्याची परवानगी नाही. केवळ डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लिखित परवानगी असल्यावरच एखाद्या व्यक्तीला फोटो काढण्याची मुभा मिळू शकते, याची तुम्हाला कल्पना आहे,' असं डीजीसीएनं आदेशात म्हटलं आहे. विमान लँडिंग, टेक ऑफ करत असताना लिखित परवानगी लागू नसेल, असंही डीजीसीएनं स्पष्ट केलं आहे. सुरक्षेचे सर्वोच्च मापदंड राखले जावेत यासाठी हा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. नियमांचं पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा डीजीसीएनं दिला आहे. 'प्रवासी विमानात नियमांचं उल्लंघन झाल्यास विमानाच्या त्या मार्गावरील फेऱ्या पुढील दिवसापासून दोन आठवड्यांपर्यंत रद्द करण्यात येतील. संबंधित विमान कंपनीनं नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर योग्य कारवाई केल्यानंतरच तिला सेवा पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात येईल,' असं डीजीसीएनं आदेशात म्हटलं आहे.

टॅग्स :Airportविमानतळ