संगरुरः बोअरवेलमध्ये पडलेला दोन वर्षीय मुलगा फतेहवीर सिंह याला तब्बल 109 तासांनी बाहेर काढण्यात यश आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याला जीव गमवावा लागला आहे. फतेहवीर नावाचा हा दोन वर्षांचा मुलगा गुरुवारी संध्याकाळी 150 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. पंजाबमधल्या भगवानपुरा गावात कोरड्याठाक पडलेल्या या बोअरवेलला कपड्यानं झाकून ठेवण्यात आलं होतं. फतेहवीर खेळता खेळता जाऊन त्या बोअरवेलमध्ये पडला.सुरुवातीला त्याच्या आईनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या मातेचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी बचाव पथक आले. बचाव पथक रविवारपर्यंत मुलाच्या जवळपास पोहोचलं होतं. परंतु त्याला बाहेर काढण्यात त्यांना सातत्यानं अपयश येत होतं.
VIDEO- बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा 109 तासांनी बाहेर काढल्यानंतर मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:17 AM