ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली. दि. १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी समलैंगिक संबंधाच्या वक्तव्यावरुन यु-टर्न घेतला आहे. दत्तात्रय होसबळे यांनी स्पष्टीकरण देत 'समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिक सामाजिक अनैतिकता आहे ज्याच्यावर मानसिकदृष्ट्या उपचार करणं गरजेचं असल्याचं', म्हंटल आहे.
गुरुवारी इंडिया टुडेच्या परिसंवादात दत्तात्रय होसांबळे यांनी समलैंगिक संबंधांवर मत व्यक्त केले होते. समलैंगिकतेवर आरएसएसने भूमिका का मांडावी? दुस-याच्या आयुष्यावर परिणाम होत नसेल तो पर्यंत समलैंगिक संबंध गुन्हा ठरत नाही. लैंगिक पसंती हा प्रत्येकाचा खासगी विषय आहे असल्याचं दत्तात्रय होसांबळे बोलले होते.
शुक्रवारी दत्तात्रय होसबळे यांनी स्पष्टीकरण देत ट्विट केलं. 'समलैंगिक संबंध गुन्हा नाही आहे मात्र आपल्या समाजातील ही अनैतिकता आहे. त्यांना शिक्षा देण्याची गरज नाही मात्र त्यांच्यावर मानसिकदृष्ट्या उपचार करणं गरजेचं आहे', असं ट्विट दत्तात्रय होसबळे यांनी केलं आहे.
Homosexuality is not a crime, but socially immoral act in our society. No need to punish, but to be treated as a psychological case.— Dattatreya Hosabale (@DattaHosabale) March 18, 2016
Gay marriage is Institutionalization of homosexuality. It should be prohibited.— Dattatreya Hosabale (@DattaHosabale) March 18, 2016