नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमधील अहमदाबाद येथील एका सामान्य रिक्षाचालकाच्या घरी डिनर करत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. रिक्षाचालकाने केजरीवाल यांना डिनरसाठी आमंत्रित केले होते. या डिनरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. आता रिक्षाचालक विक्रम दंतानी यांनी यू-टर्न घेतला आहे. ' मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता आहे, तसेच मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे.
दंतानी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते, त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सोबत डिनर संदर्भातील प्रश्न केले, यावेळी त्यांनी मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले.
पीएफआयपासून आरएसएसच्या नेत्यांना धोका, केंद्र सरकारने दिली वाय दर्जाची सुरक्षा
यावेळी दंतानी म्हणाले, मला रिक्षा युनियनच्या नेत्यांनी केजरिवाल यांना डिनरसाठी आमंत्रित करण्यास सांगितले होते.त्यामुळे मी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात त्यांना बोलावले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दंतानी यांच्या घरी रिक्षातून डिनरसाठी आल्यानंतर रिक्षाचालक दंतानी चांगलेच चर्चेत आले होते.
अहमदाबाद मधील कार्यक्रमामध्ये मी केजरीवाल यांना डिनरसाठी बोलावले यावेळी केजरीवाल यांनी लगेच होकार दिला. मला माहित होते हा मोठा मुद्दा होणार आहे. मा आम आदमी पक्षासी जोडलेलो नाही.मी त्यानंतर आपच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही, असंही दंतानी म्हणाले.
मी आज भाजपच्या रॅलीमध्ये सामील झालो आहे, कारण मी पंतप्रधान मोदी यांचा चाहता आहे. मा नेहमी भाजपला मत दिले आहे. हे मी कोणाच्याही दबावात येऊन सांगत नाही, असंही दंतानी म्हणाले.