UAE India Joint Military Exercise In Desert: भारतीय सैन्य आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सैन्यात शाहजहान युद्ध सराव होणार आहे. यासाठी यूएईचे सैन्य राजस्थानच्या वाळवंटात पोहोचले आहे. या युद्ध सरावाला ‘डेझर्ट सायक्लोन’ असे नाव देण्यात आले आहे. हा युद्ध सराव 2 जानेवारीपासून सुरू होणार असून 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
यासाठी भारतीय लष्कराची तुकडीही राजस्थानात पोहोचली आहे. तर 'डेझर्ट सायक्लोन 2024', भारत आणि UAE च्या सैन्यादरम्यान सुरू होणारा संयुक्त युद्ध सराव थारच्या वाळवंटात आयोजित केला जाईल. याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या लष्करी सरावाकडे लागल्या आहेत.
दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतीलभारतीय लष्कराच्या सार्वजनिक माहितीच्या अतिरिक्त महासंचालनालयाने (ADGPI) शेअर केलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील संयुक्त सराव सुमारे दोन आठवडे चालणार आहे. डेझर्ट सायक्लोनचे उद्दिष्ट शहरी ऑपरेशन्सच्या सर्वोत्तम पद्धती आणि इंटरऑपरेबिलिटी सुधारण्याचे आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील.
डीजीपीआयच्या मते, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचे शेकडो वर्षांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये चांगले धार्मिक आणि आर्थिक संबंध आहेत. यातून दोन्ही सैन्याला शिकायला मिळेल.
नौदलाने युद्ध सरावही केला याआधी ऑगस्टमध्ये दोन्ही लष्कराच्या नौदलाने संयुक्त सराव केला होता. भारतीय नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस त्रिखंडने या सरावात भाग घेतला. विशेष बाब म्हणजे मध्यपूर्वेतील इस्रायल आणि हमासच्या सैनिकांमध्ये गाझा पट्टीत सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारत-यूएई लष्कराचा लष्करी सराव चर्चेत आहे.