शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उबर टॅक्सीचालकाला मरेपर्यंत जन्मठेप

By admin | Published: November 04, 2015 2:06 AM

अकरा महिन्यांपूर्वी आपल्या टॅक्सीत एका २५ वर्षीय महिला अधिकाऱ्यावर बलात्कार करणारा उबर टॅक्सीचालक शिवकुमार यादव याला दिल्लीच्या एका न्यायालयाने मंगळवारी

नवी दिल्ली : अकरा महिन्यांपूर्वी आपल्या टॅक्सीत एका २५ वर्षीय महिला अधिकाऱ्यावर बलात्कार करणारा उबर टॅक्सीचालक शिवकुमार यादव याला दिल्लीच्या एका न्यायालयाने मंगळवारी त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.विवाहासाठी बाध्य करण्याच्या हेतूने या महिलेचे अपहरण करणे आणि तिच्यावर बलात्कार करण्याच्या आरोपात दोषी ठरविण्यात आलेला ३२ वर्षीय शिवकुमार यादव याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी ही मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ‘आरोपीला (यादव) भादंविच्या कलम ३७६ (२) (एम) (जबर दुखापत करीत बलात्कार करणे), ३६६, ५०६ आणि ३२३ अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. आरोपीला तो नैसर्गिकरीत्या जिवंत असेपर्यंत ही शिक्षा भोगावी लागेल. या शिक्षेसोबतच आरोपीला २१ हजार रुपये दंडही ठोठावण्यात येत आहे,’ असे न्या. बावेजा म्हणाल्या. बलात्कार पीडितेला नुकसानभरपाई देण्याचे आणि आरोपीच्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे निर्देशही न्या. बावेजा यांनी दिले. न्या. बावेजा यांनी तब्बल दीड तासपर्यंत फिर्यादी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल जाहीर केला. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच आरोपी यादव, त्याची पत्नी, वडील आणि दोन्ही अल्पवयीन मुलींनी न्यायालयातच हंबरडा फोडला.