संतापजनक! महाराणा प्रताप यांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी, भाजपाच्या सभेतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:17 PM2021-03-10T13:17:36+5:302021-03-10T13:23:00+5:30
BJP Maharana Pratap : भाजपाच्या सभेतील फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर उदयपूरमधील एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये महाराणा प्रताप यांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी असलेलं पाहायला मिळत आहे. भाजपाच्या सभेतील धक्कादायक प्रकारामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राजस्थानातील वल्लभनगर (Vallabhnagar) विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या (BJP) युवक संमेलनात प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया (Satish Poonia) यांच्या हस्ते तरुणांना वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या (Maharana Pratap) प्रतिमा देण्यात आल्या. मात्र त्या स्वीकारल्यानंतर मंचावर बसलेल्या पदाधिकारी आणि पाहुण्यांच्या पायांजवळ त्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या सभेतील फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाने महाराणा प्रतापांचा अपमान केला असल्याचं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजपाचे नेते मंडळी मंचावर उपस्थित असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याने टीकास्त्र सोडलं जात आहे. याप्रकरणी भाजपाच्या नेत्यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागितली आहे. मात्र तरी देखील हा वाद शांत होत नाही. महाराणा प्रताप यांचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हणत सोशल मीडियावरही भाजपावर हल्लाबोल केला जात आहे.
माजी मंत्री आणि खासदार सी. पी. जोशी (C. P. Joshi) यांनी सर्वांत पहिल्यांदा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून याबाबत जनतेची जाहीर माफी मागितली. नकळतपणे ही चूक झाली आहे त्याबद्दल आम्ही जनतेची माफी मागतो असं त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. भाजपाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून याबाबत माफी मागण्यात आली आहे. महाराणा प्रताप संपूर्ण भारतवर्षासाठी आदरणीय आणि अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल आपणा सर्वांच्याच मनात प्रचंड आदर आहे. आमच्या चुकीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो असं म्हटलं आहे.
"सरकार शेतकरी नेते आणि त्यांच्या समर्थकांवर छापे टाकतं", राहुल गांधींचा गंभीर आरोपhttps://t.co/MxJ48ke0U4#RahulGandhi#Congress#NarendraModi#BJPpic.twitter.com/SSYhCooYwn
— Lokmat (@MiLOKMAT) March 4, 2021
भाजपाच्या या सभेचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सर्वच स्तरातून भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. महाराणा प्रतापांचा अपमान केल्याने निशाणा साधला जात आहे. तसेच वल्लभनगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. देशात सत्तेत असलेल्या भाजपला अहंकार झाला असून त्यामुळेच ते वीरपुरुषांचा अपमान करत आहेत अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
प्रकाश राज यांची मोदी सरकारवर बोचरी टीका, म्हणाले...https://t.co/sRpyBtXPMH#PrakashRaj#ModiGovt#NarendraModi#CylinderRatepic.twitter.com/XPkqjQIKV7
— Lokmat (@MiLOKMAT) March 4, 2021