नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही उपस्थित राहणार आहेत. अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (15 जून) पत्रकार परिषद घेतली. मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठं यशही मिळालं आहे. त्यामध्ये शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला आहे. आता 18 खासदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे रविवारी (16 जून) अयोध्येचा दौरा करणार आहेत. शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा कधीही राजकीय मुद्दा म्हणून समोर आणला नाही. तसेच प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मागितली नाहीत असं राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर अयोध्येत येणार असल्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठीच ते येथे येणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.
'भाजपा आणि एनडीएला बहुमत मिळालं आहे हा आम्ही प्रभू रामचंद्राचा आशीर्वादच समजतो. आमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेच सुप्रीम कोर्टाच्या ठिकाणी आहेत' असंही संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच समान नागरी कायदा आणला जावा, कलम 370 हटवलं जावं आणि राम मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू व्हावं या आमच्या मुख्य मागण्या आहेत. देशाला अमित शहा यांच्या रूपाने एक सक्षम गृहमंत्री मिळाले आहेत त्यामुळे हे प्रश्न सुटतील असं ही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी ''पहले मंदिर फिर सरकार' हा नारा आम्हीही दिला होता, मात्र पुलवामा येथे आपल्या जवानांवर हल्ला करण्यात आला. देशाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने राम मंदिर निर्मितीचा मुद्दा आम्ही बाजूला ठेवला होता. आता मात्र स्पष्ट बहुमत मिळालं आहे केंद्रात मोदी सरकार आहे. हे सरकार राम मंदिराची निर्मिती नक्की पूर्ण करेल असा आम्हाला विश्वास वाटतो' असंही म्हटलं आहे. उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याने या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची देखील माहिती दिली. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत. ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता.
अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (15 जून) पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जोर लावून काम करत आहेत. शिवसेनेचे एक नेते असल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी आपली कामं सुरू केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही उपस्थित राहणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांचे ट्विट, उद्धव ठाकरेंची घेतली भेट
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक वावड्या उठत असतानाच, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतच विस्ताराबाबत जाहीर केले जाईल, तर अधिवेशनापूर्वी म्हणजेच रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.