उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंड येथील एसटीएफने सोशल नेटवर्किंग साइट मेटावरून अचानक पोन आला. या आलेल्या एका फोन कॉलवर तातडीने कारवाई करून एका तरुणीला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आले. उत्तराखंडच्या पोलीस प्रमुखांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
पोलिसांनी केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटले की, "अमेरिकन कंपनी मेटातून एक फोन कॉल आला आणि मध्यरात्री उत्तराखंड पोलिसांनी मुलीचे प्राण वाचवले."
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उधम सिंह नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही तरुणी 'इन्स्टाग्राम'वर आत्महत्या करण्याच्या ठिकाणांबद्दल विचारत होती आणि साईटवर आत्महत्येशी संबंधित इतर काही गोष्टीही सर्च करत होती. मुलीच्या या पोस्ट/कमेंट पाहून 'मेटा'ने बुधवारी रात्री उत्तराखंड स्पेशल टास्क फोर्स (STF) नोडल ऑफिसर अंकुश मिश्रा यांना फोन केला आणि संपूर्ण माहिती दिली आणि मुलीच्या पोस्टची लिंकही शेअर केली. याची माहिती मिळताच मिश्रा यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; टायर पंक्चर, दरवाजे उघडण्याचा प्रयत्न
मेटाच्या तंत्रज्ञानामुळे आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे एखाद्याचा जीव वाचल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सोशल मीडियाच्या या युगात या आव्हानांना तोंड देण्यासाठी मेटा आणि पोलिसांची जलद कारवाई कौतुकास्पद आहे.