नवी दिल्ली : विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना विनापरीक्षा ‘प्रमोट’ करण्याबाबत महाराष्टÑ सरकारने आवाज उठवल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांनीही याबाबत मागणी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या परीक्षांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगावर (यूजीसी) टीकास्त्र सोडले आहे.राहुल गांधी यांनी टष्ट्वीट करीत म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या उद्रेकामध्ये परीक्षा घेणे चुकीचे ठरेल. यूजीसीने विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा आवाज ऐकला पाहिजे. परीक्षा रद्द करून त्यांच्या मागील गुणांवर त्यांना प्रमोट केले पाहिजे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याची नुकतीच घोषणा केली आहे. या परीक्षा जुलैमध्ये होणार होत्या. कोरोना महामारीमुळे परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. यूजीसीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सप्टेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. राहुल गांधी यांनी टष्ट्वीट करीत एक व्हिडिओ संदेशही जारी केला आहे. यूजीसी संभ्रम निर्माण करीत आहे. कोरोनाने अनेक लोकांचे नुकसान केले आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
यूजीसीने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकावा - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 4:39 AM