भोपाळः उत्तर प्रदेशमधला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार विकास दुबे याला मध्य प्रदेशमधल्या उज्जैन येथे अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस विकास दुबेच्या मागावर होते. विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्रीगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तत्पूर्वी विकास दुबेनं फिल्मी स्टाइल आत्मसमर्पण केलं. उज्जैनच्या महाकाल मंदिर संकुलापर्यंत २५० रुपयांचं तिकीट घेऊन तीन साथीदारांसह विकास दुबे दर्शनाच्या प्रतीक्षेत होता. तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षाकाला संशय आला, त्यानं विकास दुबेची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला पोलिसांकडे सुपूर्त केले. पोलिसांसमोरच त्यानं मोठमोठ्यानं ओरडून सांगितलं की, मीच कानपूरवाला विकास दुबे आहे. त्याला ताबडतोब मंदिराच्या आवारात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी पकडले आणि पोलिसांना कळविले.विकास दुबे उज्जैनच्या तिवारी नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होता. तिवारीमार्गेच त्यानं उज्जैन गाठले होते. अटकेनंतर यूपी पोलिसांना त्याविषयी माहिती देण्यात आली. त्याच्या अटकेचा फोटो यूपी पोलिसांनाही पाठविण्यात आला आणि त्यानंतर हाच विकास दुबे असल्याची खात्री पटली.
हेही वाचा
नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा
मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक
रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा
तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका