शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

उज्जैनला केला पत्नी व लेकीचा विधी! इंजेक्शन देऊन दोघींना संपवले : हत्याकांडानंतर सहाव्या दिवशी सचिन परतला जळगावात

By admin | Published: May 11, 2016 10:15 PM

जळगाव : पत्नी कविता व मुलगी रेणाक्षी जाधव यांना सचिनने इंजेक्शन देऊन संपवले. त्यानंतर उज्जैनला जाऊन त्याने दोघींचा पारंपरिक विधीदेखील केला, अशी धक्कादायक माहिती सचिनच्या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.

जळगाव : पत्नी कविता व मुलगी रेणाक्षी जाधव यांना सचिनने इंजेक्शन देऊन संपवले. त्यानंतर उज्जैनला जाऊन त्याने दोघींचा पारंपरिक विधीदेखील केला, अशी धक्कादायक माहिती सचिनच्या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत; सचिनने हत्याकांडाचा घटनाक्रम सांगितला. ५ मे रोजी मध्यरात्रीनंतर त्याने लेकीसह पत्नीची इंजेक्शन देऊन हत्या केली. त्यानंतर रात्रीच दुचाकीने अजिंठा चौफुली परिसरात गेला. दुचाकी तेथेच सोडून तो पुढे शिर्डीला निघून गेला. ६ ते १० मे २०१६ या कालावधित तो दिल्ली, ग्वाल्हेर, उज्जैन याठिकाणीही गेला. उज्जैनला आल्यावर कुंभमेळ्यातही फिरला होता. त्याच ठिकाणी त्याने पत्नी व लेकीचा विधीदेखील केला. या क्षणापर्यंत त्याला इकडे पोलिसांनी हत्याकांडाच्या गुन्‘ात त्याच्या कुटुंबीयांना अटक केल्याची कल्पनाही नव्हती.
कुटुंबावरील प्रेमाने आणले ओढून
आपण केलेल्या कृत्यानंतर आई-वडील, भाऊ-वहिनी यांचे काय झाले असावे? या विचाराने त्याच्या मनात काहूर माजले होते. आई-वडिलांवर असलेले त्याचे प्रेम आणि आता आपले सगळे संपले आहे, या विचारातून त्याने पोलिसांना शरण जाण्याचा विचार केला. म्हणून तो १० रोजी रात्री पंजाब मेल एक्सप्रेसने जळगावला येण्यासाठी निघाला. बुधवारी सकाळी ७ वाजता तो जळगावात पोहोचला, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.
स्वत:ला संपणार होता?
सचिनने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्या जाण्यानंतर पत्नी, मुलींचे काय होणार? या विचारातून त्याने त्यांनाही संपवण्याचे ठरवले. म्हणून पत्नी व मुलीला इंजेक्शन दिल्यानंतर स्वत:ही इंजेक्शन घेतले. परंतु इंजेक्शन घेतल्यावर अर्ध्या तासानंतर त्याला जाग आली, अशीही माहिती समोर येत आहे. परंतु त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.