खून खटल्यात सरकारतर्फे उज्ज्वल निकम हजर १ जुलैला सुनावणी : कुसुंबा येथील रमेश सोनवणे खूनप्रकरण
By admin | Published: June 19, 2016 12:17 AM
जळगाव : कुसुंबा येथील हॉटेल योगेशसमोर ६ एप्रिल २००८ रोजी पूर्ववैमनस्यातून रमेश तोताराम सोनवणे (वय ४८, रा.कुसंुबा, ता.जळगाव) यांचा खून झाला होता. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून ते शनिवारी हजर झाले.
जळगाव : कुसुंबा येथील हॉटेल योगेशसमोर ६ एप्रिल २००८ रोजी पूर्ववैमनस्यातून रमेश तोताराम सोनवणे (वय ४८, रा.कुसंुबा, ता.जळगाव) यांचा खून झाला होता. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून ते शनिवारी हजर झाले.पूर्ववैमनस्यातून रमेश सोनवणे यांचा संशयित आरोपी भूषण सोनवणे, अनिल घुले, ज्ञानेश्वर मराठे, वासुदेव सोनवणे यांनी तलवार व बेसबॉलच्या दांड्याने मारहाण करीत खून केला होता. या प्रकरणी अनिल मोतीराम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरील संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात शनिवारी विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम आणि जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके हे शनिवारी हजर झाले. या प्रकरणी पुढील सुनावणी १ जुलैला होणार आहे. संशयितांकडून ॲड.अकील इस्माइल, ॲड.प्रकाश पाटील काम पाहत आहेत.