ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 07 - उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये जाण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. ब्रिटिश कौन्सिल यासंबधीची 'ग्रेट स्कॉलरशिप 2017' योजना सुरु करणार आहे. यासाठी 8.38 कोटी रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्कॉलरशिपचा मुख्य उद्देश असा आहे की, जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये येणास प्रोत्साहित करणे हा आहे.
ब्रिटिश कौन्सिलने स्कॉलरशिप या योजणेच्या प्रचारासाठी 'स्टडी यूके: डिस्कवर यू' असे नाव दिले आहे. कला, डिझाइन, अभियांत्रिकी, लॉ आणि मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रातील शिक्षणासाठी या योजणेच्या माध्यमातून 198 स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.
दरम्यान, या योजनेची माहिती देण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलने हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये ब्रिटनमधील 20 महाविद्यालयांचे प्रतिनिधी सामील झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच व्हिसासंबंधी स्कॉलरशिपला लागणारी माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. याचबरोबर 'स्टडी यूके: डिस्कवर यू' या नावाने अॅप सुद्धा सुरु करण्यात येणार आहे.