शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

युक्रेनची वधू अन् रशियाच्या वराचा भारतीय रिवाजानुसार विवाह; युद्धाच्या अडथळ्यावर केली मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 8:16 AM

धर्मशाला येथे झाला सोहळा

नवी दिल्ली : युक्रेन व रशियाचे युद्ध कधी संपणार याबद्दल अनिश्चितता आहे. मात्र, प्रेम युद्ध किंवा अन्य अडथळ्यांवर मात करून यशस्वी होते हे दर्शविणारी एक घटना घडली आहे. रशियाचा वर व युक्रेनची वधू हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे येऊन भारतीय रीतीरिवाजांनुसार विवाहबद्ध झाले.  

युद्ध संपण्याची चिन्हे नसल्याने रशियाचा नवरदेव सेर्गेई नोविकोव व युक्रेनची वधू एलोना ब्रामोका यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी भारतात येऊन विवाह करण्याचे ठरविले. त्या अनोख्या विवाहाबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर झळकल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या जो़डप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. विवाहप्रसंगी वधू एलोना ब्रामोका हिने लाल रंगाची साडी, तर सेर्गेई नोविकोव या नवरदेवाने शेरवानी परिधान केली होती.

विवाहप्रसंगी पुरोहित म्हणत असलेल्या मंत्रांचा अर्थ समजून घेण्यासाठी या जोडप्याने एका दुभाष्याची मदत घेतली. धर्मशाला येथील एका मंदिरात हा अनोखा विवाह थाटात पार पडला. सेर्गेई नोविकोव व एलोना ब्रामोका यांची प्रेमकहाणी दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यावेळी रशिया, युक्रेनचे संबंध विकोपाला गेले नव्हते; पण काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या युद्धामुळे परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी या जोडप्याने भारतात जाऊन विवाह केला. (वृत्तसंस्था)

युक्रेन युद्धभूमीवरही झाले विवाह

युक्रेनमधील एक युवक, युवतीची २०१५ साली युद्ध प्रशिक्षणामध्ये भेट झाली होती. ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांची युक्रेन युद्धात पुनश्च भेट झाली. युद्ध सुरू असतानाही या जोडप्याने विवाह करण्याचा निर्णय घेतला. किव्हनजीक असलेल्या एका रुग्णालयात यंदाच्या वर्षी हा विवाह सोहळा पार पडला. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतmarriageलग्न