ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १ - विख्यात विनोदी लेखक तारक मेहता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मेहता यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार त्यांचे पार्थिव मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. २०१५ साली सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
तारक मेहता यांनी मार्च १९७१ पासून ' चित्रलेखा' या गुजराती साप्ताहिकासाठी ' दुनिया ना उंधा चश्मा' या नावाने स्तंभलेखन केले होते. त्यावरच आधारित 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिका गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. जेठालाल, दया, टप्पू, बाबूजी या सर्व पात्रांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले.
The popular series 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' is TV adaptation of Padma Shri Taarak Mehta's column 'Duniya Ne Undha Chasma' pic.twitter.com/zSf1sPFFok— ANI (@ANI_news) March 1, 2017