नवी दिल्ली - काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेली खडाखडी अशा गेले दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच दरम्यान अनेकांना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी देखील काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राजकारणातून नेहरु आणि गांधी घराण्याचं अस्तित्व संपलं असं म्हणत उमा भारती यांनी जोरदार टीका केली आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. "काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे पक्षाची स्थिती दिसून येते. पक्षाला विदेशी नाही तर स्वदेशी गांधींची गरज आहे. विदेशी गांधीमुळे पक्षाचं भलं होणार नाही" असं देखील उमा भारती यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांच्या काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोडण्याच्या विचारांचे भाजपा नेत्या उमा भारती स्वागत केले होते. आपला देश घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त व्हावा, असे मला वाटते आणि देशाला घराणेशाहीपासून मुक्त करायचे असेल तर त्याची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली होती. म्हणून मी सोनिया गांधी यांना भरपूर मानते आणि त्या आदराच्या भावनेनेच मी असे बोलत आहे, असं विधान उमा भारती यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षावरून बराच खल होऊन अखेरीस नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधींकडे पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, आता 23 नेत्यांनी पत्र लिहून केलेल्या नेतृत्वबदलाच्या मागणीनंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. मात्र पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडेच कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय कार्यकारी समितीने घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
लयभारी! शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज; शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे
फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य
"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल
"काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार"
"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक