शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

उमेश पाल हत्याकांड: अतिक अहमदच्या मुलाचं झाशीमध्ये एन्काऊंटर, UP पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 1:45 PM

Umesh Pal murder case: उत्तर प्रदेशमधील कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील शूटर असद याचं पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे.

उत्तर प्रदेशमधील कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील शूटर असद याचं पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे. झाशीमध्ये यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली पाच लाख रुपयांचे बक्षीस अशलेला असद आणि मोहम्मद गुलाम यांना ठार करण्यात आले. दोघांकडूनही पोलिसांनी शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

एकीकडे उमेश पाल हत्याकांडाप्रकरणी अतिक अहमद आणि अश्रफ यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांना या प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. यूपी एसटीएफने झाशी येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये अतिक अहमदचा मुलगा असद याला ठार मारले आहे. त्याच्यासोबत उमेश पाल याची दिवसाढवळ्या हत्या करणारा मोहम्मद गुलाम हा सुद्धा मारला गेला आहे.

२४ फेब्रुवारी रोजी  प्रयागराज येथे राजू पाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा घरी जात असताना कारजवळ दबा धरून बसलेल्या  शूटर्सनी गोळीबार केला. यादरम्यान बॉम्बही फेकण्यात आले. या हल्ल्यात उमेश पाल आणि त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन गनर्सचा मृत्यू झाला होता.

उमेश पालच्या पत्नीने या प्रकरणी अतिक अहमद त्याचा भाऊ अश्रफ याच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस शाइस्ता सह पाच शूटर्सचा शोध घेत होते. दरम्यान, पोलिसांना आज याबाबत यश मिळालं आहे. पोलिसांना मोठी कारवाई करत ४७ दिवसांपासून फरार असलेल्या असद आणि गुलाम यांना ठार केलं आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश