शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 3:58 PM

जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील आहेत.

UN Reports On Marriage: दरवर्षी भारतात लाखो तरुणी विवाहबंधनात अडकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील अनेकींचे कमी वयात लग्न होते. एका आकडेवारीनुसार, भारतात 20 कोटींहून अधिक महिलांचा बालविवाह झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील तरुणी आहेत.

सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिपोर्ट 2024 नुसार, प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचे 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न होते, तर 25 वर्षापूर्वी लग्न करणाऱ्यांची संख्या चारपैकी एक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या असून गेल्या काही वर्षांत 68 कोटी बालविवाह रोखण्यात आले आहेत.

स्त्री-पुरुष समानतेत जग मागे पडले एवढ्या प्रगतीनंतरही लिंग समानतेत जग मागे पडल्याची खंत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेक महिलांना अजूनही लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या अभावासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्याची परिस्थिती पाहता स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी 176 वर्षे लागतील.

जगभरातील परिस्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेल्या 169 उद्दिष्टांपैकी 2030 पर्यंत केवळ 17 टक्के उद्दिष्टे साध्य होतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2015 मध्ये जगभरातील नेत्यांनी जी उद्दिष्टे निश्चित केली होती, ती गरिबी संपवणे, स्त्री-पुरुष समानता मिळवणे आणि अशा अनेक समस्या सोडवणे होते, परंतु या उद्दिष्टांकडे आपली वाटचाल थांबली आहे.

प्रयत्न अधिक तीव्र करणे आवश्यक संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या म्हणण्यानुसार, हा अहवाल पाहता, 2030 पर्यंत अजेंडा पूर्ण होईल, परंतु त्यासाठी आपल्या प्रयत्नांना आणखी मजबूत करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :marriageलग्नunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत