नांगरटीचे दर भडकले शेतकरी वर्गात नाराजी
By admin | Published: January 21, 2017 2:10 AM
सावरवाडी : यंदाच्या रब्बी व उन्हाळी हंगामात शेती मशागतीच्या कामाची नांगरट करण्यासाठी ट्रॅक्टर नांगरटीचे दर जानेवारी महिन्यापासून भडकल्याने करवीर तालुक्यात शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.
सावरवाडी : यंदाच्या रब्बी व उन्हाळी हंगामात शेती मशागतीच्या कामाची नांगरट करण्यासाठी ट्रॅक्टर नांगरटीचे दर जानेवारी महिन्यापासून भडकल्याने करवीर तालुक्यात शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.एकीकडे नोटाबंदीचा आर्थिक फटका शेती व्यवसायाला बसला असून, दुसरीकडे डिझेल तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर मालकांनी नांगरट करण्यासाठी प्रतिगुुंठ्यामध्ये २५ टक्के दरवाढ केल्याने शेतीच्या नांगरटीच्या कामांमध्ये व्यत्यय येऊ लागला आहे.ऐन हंगामात शेती मशागतीच्या कामांमध्ये मजुरांनी मजुरीची दरवाढ केल्याने मशागतीच्या कामांना शेतकर्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी आता बैलांच्या नांगरटीकडेवळू लागला आहे. परिणामी ट्रॅक्टरच्या नांगरटीचे वाढीव दर रद्द करण्याची मागणीही शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.