शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

मशिदीत लाउडस्पीकरला परवानगी कोणत्या कायद्यानुसार? कर्नाटक हायकोर्टाची राज्याला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 6:55 AM

कायद्याच्या कोणत्या तरतुदींनुसार धार्मिक स्थळांवर लाउडस्पीकर आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर करण्यास परवानगी दिली आहे

डॉ. खुशालचंद बाहेतीबंगळुरू :

कायद्याच्या कोणत्या तरतुदींनुसार धार्मिक स्थळांवर लाउडस्पीकर आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर करण्यास परवानगी दिली आहे, याची माहिती देण्यास कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकार आणि पोलिसांना सांगितले आहे.

कर्नाटक हायकोर्टात ध्वनी प्रदूषणासंबंधी एका जनहित याचिकेवरील सुनावणीत १६ धार्मिक स्थळांवर लाउडस्पीकर वापरण्यास कायमस्वरूपी परवानगी दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.  कर्नाटक वक्फ बोर्डाने धार्मिक स्थळांवर लाउडस्पीकर लावण्यासाठी परिपत्रक जारी केल्याचा आणि या परिपत्रकाच्या आधारे मशिदींवर लाउडस्पीकर लावले आहेत. वक्फ बोर्ड लाउडस्पीकरच्या वापरासाठी परवानगी देण्यास सक्षम नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 

ध्वनी प्रदूषण नियम २००० च्या कलम ५ (३) अन्वये लाउडस्पीकर वापरण्याची परवानगी कायमस्वरूपी दिली जाऊ शकत नाही, असा दावाही  करण्यात आला आहे. हायकोर्टाने सरकारी वकिलांकडून तथ्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. मशिदींच्या वकिलांनी या मुद्द्याला विरोध केला आणि लाउडस्पीकरच्या वापरासाठी रीतसर परवानगी घेतल्याचे सांगितले. लाउडस्पीकरमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेपलीकडे आवाज जाऊ न देणारे खास उपकरण बसवलेले आहे. 

रात्री १० ते सकाळी ६ यादरम्यान लाउडस्पीकरचा वापर केला जात नाही, असेही सांगितले. मात्र, परवानगी कायमस्वरूपी वापरासाठी मिळाली आहे काय?  या प्रश्नाचे उत्तर मशिदींतर्फे उपस्थित असलेल्या वकिलांनी दिले नाही.

न्यायालयाने काय दिले निर्देश ?० मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी आणि न्यायमूर्ती सचिन शंकर मगदूम यांनी लाउडस्पीकरच्या वापरासाठी कायमस्वरूपी परवाना जारी केला आहे काय  आणि कायद्याच्या कोणत्या तरतुदींनुसार लाउडस्पीकर वापरण्याची परवानगी दिली आहे? याची माहिती देण्याचे निर्देश राज्य अधिकाऱ्यांना व पोलिसांना दिले. ० याशिवाय ध्वनी प्रदूषण नियमानुसार वापरावर निर्बंध घालण्यासाठी काय कारवाई केली जात आहे, हे सादर करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले. 

टॅग्स :MosqueमशिदKarnatakकर्नाटक