कोरोना व्हायरस माशीमुळे पसरतो : अमिताभ बच्चन यांनी विष्ठेतून व माशीमुळे कोरोना व्हायरस पसरतो, असे विधान केले होते. विष्ठेत कोरोना व्हायरस आढळू शकतो; पण तो याद्वारे पसरू शकतो, हे अजून सिद्ध झालेले नाही; तसेच माशीमुळे हा व्हायरस पसरतो यालाही अद्याप तरी शास्त्रीय आधार नाही. माशी इतरत्र कुठे कोरोनाबाधित जागेवर बसेल व ती आपल्या त्वचेवर बसून त्यातून कोरोना होईल हे शक्य नाही. म्हणून कोरोना हा माशीमुळे पसरत नाही.
कोरोना व्हायरस डासांमुळे पसरतो : हा व्हायरस शरीरात जाण्याचा मुख्य स्रोत हा बाधित व्यक्तीकडून व नाका-तोंडातून श्वसनमार्गात जाण्याचाच आहे. डेंग्यू, मलेरियाप्रमाणे तो डासांच्या माध्यमातून पसरत नाही.टाळ्या वाजवल्याने हातावरचा व्हायरसनाहीसा होतो : टाळ्या वाजवल्यावर १ ते १० किलो हर्ड्झ इतकी कमी फ्रिक्वेन्सी निर्माण होते. विषाणू, बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी ३० किलो हर्ड्झपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आवश्यक असते. म्हणून टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नष्ट होणे शक्य नाही.घरगुती उपायांनी संरक्षण मिळेल : कुठलेही घरगुती औषध, नाकात तेल टाकणे, गरम पाणी पिणे याने हा आजार टाळणे शक्य नाही.उपवास केल्याने लागण होत नाही :उपवास केल्याने उलट शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल. म्हणून या काळात कोणीही उपवास करू नये. चांगला आहार घ्यावा.उष्ण हवामानामुळे संसर्ग होणार नाही :५६ डिग्रीच्या पुढे पाणी उकळल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो; पण बाहेरचे तापमान जास्त आहे किंवा उष्ण हवामान आहे म्हणून तो नष्ट होईलच असे नाही.प्रतिकारशक्ती चांगली असल्याने भारतीयांना लागण होणार नाही : परदेशात राहणाऱ्या भारतीयांना बाधा झाली आहे. भारतीय वेगळे आहेत व त्यांना लागण होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल, असे मानण्यास सध्या काही शास्त्रीय आधार नाही.- डॉ. अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)