ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - उद्यापासून देशभरात सर्वत्र जीएसटी कररचना लागू झाल्यानंतर मोबाईल युझर्सना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जीएसटी परिषदेने विविध वस्तू, सेवांवर कर निर्धारित करताना टेलिकॉम क्षेत्राला 18 टक्क्याच्या स्लॅबमध्ये ठेवले आहे. सध्या टेलिकॉम क्षेत्रातील सेवा वापरावर 15 टक्के कर आकारला जातो.
मोबाईलचे महिन्याचे बिल भरणा-या पोस्टपोड ग्राहकांच्या बिलात 3 टक्के वाढ होईल तर, प्रीपेड ग्राहकांच्या टॉक टाईममध्ये कपात होईल.
पोस्टपेड युझर्स
सध्याच्या कररचनेनुसार जर तुम्ही महिन्याला 500 रुपयांपर्यंत मोबाईलचा वापर करता तर कराचा समावेश करुन तुम्हाला 575 रुपये बिल येते.
जीएसटी लागू झाल्यानंतर 500 रुपयाच्या मोबाईल वापरावर 590 रुपये बिल भरावे लागेल. 15 रुपयांनी तुमचे बिल वाढेल.
प्रीपेड मोबाईल
प्रीपेड मोबाईल युझर्सनी 100 रुपयांचा रिचार्ज मारला तर, 85 रुपये टॉक टाइम मिळतो.
जीएसटीमध्ये 100 रुपयांच्या रिचार्जवर 82 रुपयांचा टॉक टाइम मिळेल. म्हणजे 3 रुपयांची कपात होईल.
रिलायन्स जिओच्या प्रवेशामुळे टेलिकॉम क्षेत्रात अनेक मोठया घडामोडी घडत आहेत. अनेक प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांचे युझर्स घटले असून, नफाही कमी झाला आहे. त्यामुळे टेलिकॉम इंडस्ट्रीला जीएसटी परिषदेकडून दिलाशाची अपेक्षा होती. पण जीएसटी परिषदेने करवाढीचा निर्णय घेतला.
आणखी वाचा
काय आहे जीएसटीचे परिणाम
- बँकिंग, टेलिकॉम सेवा, फ्लॅट, तयार कपडे, महिन्याचे मोबाईल बिल आणि टयुशन फी महागणार आहे.
- 1 जुलैपासून एसी रेस्टॉरंटमधले खान-पान महागणार आहे, एसी रेस्टॉरंटमध्ये 18 टक्के कर भरावा लागेल तेच नॉन एसी रेस्टॉरंटमध्ये 12 टक्के कर द्यावा लागेल.
- मोबाईल बिल, सलून, टयुशन फी तीन टक्क्यांनी महागेल, या सर्वावर 18 टक्के कर लागेल, सध्या या सेवांवर 15 टक्के सेवा कर द्यावा लागतो.
- 1 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या कपडयांवर 12 टक्के कर द्यावा लागेल, सध्या राज्य सरकाचा 6 टक्के व्हॅट भरावा लागतो. 1 हजारपेक्षा कमी किंमतीच्या कपडयांवर पाच टक्के कर द्यावा लागेल.
- फ्लॅट किंवा दुकान घरेदीवर 12 टक्के कर भरावा लागेल सध्या सहा टक्के कर द्यावा लागतो.