ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटीच्या रुपाने देशात एक नवी कररचना लागू होईल. स्वातंत्र्यानंतरची ही देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असल्याचे बोलले जात आहे. जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असून, वर्षभराच्या अंमलबजावणीनंतरच जीएसटीचे नेमके मुल्यांकन शक्य आहे. व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम होणार आहे.
काय आहे जीएसटीचे परिणाम
- बँकिंग, टेलिकॉम सेवा, फ्लॅट, तयार कपडे, महिन्याचे मोबाईल बिल आणि टयुशन फी महागणार आहे.
- 1 जुलैपासून एसी रेस्टॉरंटमधले खान-पान महागणार आहे, एसी रेस्टॉरंटमध्ये 18 टक्के कर भरावा लागेल तेच नॉन एसी रेस्टॉरंटमध्ये 12 टक्के कर द्यावा लागेल.
- मोबाईल बिल, सलून, टयुशन फी तीन टक्क्यांनी महागेल, या सर्वावर 18 टक्के कर लागेल, सध्या या सेवांवर 15 टक्के सेवा कर द्यावा लागतो.
- 1 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या कपडयांवर 12 टक्के कर द्यावा लागेल, सध्या राज्य सरकाचा 6 टक्के व्हॅट भरावा लागतो. 1 हजारपेक्षा कमी किंमतीच्या कपडयांवर पाच टक्के कर द्यावा लागेल.
- फ्लॅट किंवा दुकान घरेदीवर 12 टक्के कर भरावा लागेल सध्या सहा टक्के कर द्यावा लागतो.
आणखी वाचा
काय होणार स्वस्त
- पोस्टल आणि रेव्हेन्यू स्टॅम्प 5 टक्क्यांनी स्वस्त होणार.
- लोणचे, सॉस आणि चटणी स्वस्त होणार.
- मीठ, चित्रकलेची पुस्तके, धान्य याला जीएसटीमधून वगळण्यात आले आहे. खेळण्याचे पत्ते, चेस बोर्ड, कॅरम बोर्ड आणि अन्य बोर्ड गेम्स स्वस्त होणार.
जीएसटीसाठीच्या संसदेच्या विशेष अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार
देशातील करप्रणालीत क्रांतिकारी बदल करणाऱ्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीला ऐतिहासिक बनवण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसने जीएसटीच्या उदघाटनासाठी शुक्रवारी मध्यरात्री बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष संयुक्त अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.