महावीरांना समजण्यासाठी नावाचा अर्थ समजून घ्या प्रतीकसागर महाराज : र्शाविका संस्थानातील धर्मसभेत केले मार्गदर्शन
By admin | Published: February 23, 2016 2:01 AM
सोलापूर : समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांना समजण्यासाठी प्रथमत: त्यांच्या नावाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प.पू. क्रांतीवीर र्शी 108 प्रतीकसागरजी महाराज यांनी केले.
सोलापूर : समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांना समजण्यासाठी प्रथमत: त्यांच्या नावाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प.पू. क्रांतीवीर र्शी 108 प्रतीकसागरजी महाराज यांनी केले. सम्राट चौक येथील र्शाविका संस्थानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत प.पू. क्रांतीवीर र्शी 108 प्रतीकसागरजी महाराज बोलत होते. धर्मसभेस संबोधन व आशीर्वाद प्रदान करतेवेळी ते म्हणाले की, महावीरमधील ‘म’ म्हणजे मनावर संयम ठेवा, ‘हा’ म्हणजे हात दयेने भरून असावा, ‘वी’ म्हणजे वीतरागता ठायी असू दे आणि ‘र’ म्हणजे रक्ताच्या थेंबाथेंबात प्रेम भरभरून राहू दे. या चार अक्षरांचा अर्थ समजल्यास खरे महावीर कळतील असे यावेळी प्रतीकसागर महाराज म्हणाले. यावेळी समाजातील सर्व मान्यवर, संस्थेचे सी.ई.ओ. हर्षवर्धन शहा, अनिल जमगे, दीपक शहा, मंगेश शहा, प्राचार्य सुकुमार मोहोळे व सर्व समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)चौकट..क्रांतीवीर र्शी 108 प्रतीकसागर महाराजांचे सकाळी 7 वा. विजापूर रोड येथील बाहुबली मंदिरापासून प्रस्थान झाले. माणिक चौक येथील र्शी 1008 आदिनाथ मंदिरात आगमन झाले. तेथून बँडपथक, ढोल-ताशे व झांजपथकांच्या मधुर ध्वनी लहरींसोबत भाविकांच्या जयजयकारासह मुनीर्शींचे र्शाविकेत स्वागत झाले. फोटो ओळ : सम्राट चौकातील र्शाविका संस्थान येथे धर्मसभेत बोलताना प.पू. क्रांतीवीर र्शी 108 प्रतीकसागरजी महाराज. (......फोटो : टी / युजर/ फोटो/फेब्रु16/22एच.आर.31 नावाने सेव आहे..........)