Corona Virus Lockdown: गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनची (first Lockdown) घोषणा झाली तेव्हा लाखोंच्या संख्येने लोक आपल्या गावी परतले. अनेकजण बेरोजगार झाले, लॉकडाऊन संपताच पुन्हा शहरांकडे वळले. मात्र, यामध्ये एक व्यक्ती असा होता ज्याने इतिहास रचला. तो बेरोजगार झाला म्हणून गावी जरूर आला, परंतू आपल्यासोबत 70 लोकांना रोजगार दिला. (Unemployed in lockdown; Man went village and gave jobs for 70 people in Odisha.)
रंजन साहू हे (40 वर्ष) पहिल्या लॉकडाऊनमध्ये गावी निघून आले. ते कोलकातामध्ये सात वर्षांपासून एका कापड उद्योग करणाऱ्या कंपनीत काम करत होते. ही कंपनी लॉकडाऊनमुळे बंद पडली आणि त्या कंपनीतील सर्व कर्मचारी बेरोगार झाले. साहू हे यामुळे केंद्रपाडा येथील गुंथी गावात परतले. त्यांनी कपड्याच्या शिलाईचे काम सुरु केले. एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कंपनीतील अनुभव वापरून आपल्यासोबत ७० तरुणांना या कामाला लावले, जे आपली नोकरी गमावून बसले होते.
साहू सांगतात, घरी परतल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार नव्हता. कुटुंबाचा खर्च चालविण्यासाठी काही मोजकेच पैसे शिल्लक होते. मात्र, अनेकांकडे ते देखील नव्हते. हे सर्वजण कोणते ना कोणते काम मिळते का हे पाहत होते. माझ्या गावात अनेकजण केरळ आणि सूरतहून परतले होते. यांनी कापड उद्योगात काम केले होते. यामुळे मी विचार केला की या लोकांना घेऊन मी कापड उद्योग सुरु करू शकतो.
भुवनेश्वरपासून 110 किमी दूरवर असलेल्या गावात साहूने कापड उद्योग सुरु केला. याचे नाव ठेवले रॉयल ग्रीन गारमेंट कंपनी. 45 शिलाई मशिने गोळा केली आणि 3000 स्क्वे. फूटांच्या एका मोठ्या छपराखाली कंपनी उभी केली. साहू यांनी 18 वर्षांपूर्वी ओडिसा सोडले होते. त्यांनी दिल्ली, बंगळुरु, कोलकाता, सूरत आणि नेपाळमध्ये कापड उद्योगांमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला होता. या कंपन्यांमध्ये त्यांनी सर्व कामे केली होती, परंतू आपली कंपनी उभी होईल असा विचारही केला नव्हता. आता हा व्यवसाय ते वाढविण्याचा विचार करत आहेत.