लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर वाढून ७.४५ टक्के झाला. जानेवारीत तो ७.१४ टक्के होता. शहरांतील बेरोजगारी ८.५५ टक्क्यांवरून घटून ७.९३ टक्के झाली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ६.४५ टक्क्यांवरून वाढून ७.२३ टक्के झाला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढली असली, तरी अजूनही शहरांतील बेरोजगारी अधिक आहे.
सरकारी नोकऱ्या झाल्या कमीकेंद्र आणि राज्य सरकारांच्या नोकऱ्यांत २०२२ मध्ये ८ टक्के घट झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या एनपीएस डेटानुसार, २०२२ मध्ये एनपीएसमध्ये ५,६५,५०० नवीन सदस्य दाखल झाले. २०२१ च्या तुलनेत हा आकडा ८ टक्के कमी आहे.
गावांमध्ये महिला सुस्थितीतगेल्यावर्षी ग्रामीण भागात महिलांची स्थिती अधिक चांगली असल्याचे आढळून आले. शहरांत महिलांचा बेरोजगारीचा दर २७.९ टक्के राहिला. ग्रामीण भागात हा दर अवघा ४.५ टक्के असल्याचे आढळून आले.