अहमदाबाद : गुजरातच्या राजधानीतील नवरंगपुरा पोलीस ठाण्यात नेमणूक झालेला लोकरक्षक दलाचा (एलआरडी) कॉन्स्टेबल हरेश विठ्ठल एमबीए झालेला आहे. एक महिला कॉन्स्टेबलही तितकीच उच्चशिक्षित आहे. गुजरातमध्ये २०१७ साली लोकरक्षक दलात भरती झालेले हजार जण पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. त्यातील काही तर इंजिनीअर, तंत्रज्ञानविषयक प्रगत शिक्षण घेतलेलेही आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी आणि या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ही असणे.नोकऱ्यांची कमतरता व कायम नोक-यांची इच्छा यांमुळेच उच्चशिक्षित युवक मिळेल त्या नोकºयांकडे वळत आहेत. गुजरातसह संपूर्ण देशभर हीच स्थिती आहे. बीए, बीएड, बॅचरल इन कम्प्युटर अॅप्लिकेशन, पोस्ट डीग्री, डिप्लोमा इन कम्प्युटर अॅप्लिकेशन असे उच्चशिक्षण घेतलेले अनेकजण लोकरक्षक दलात भरती झाले आहेत. काहींनी तर माहिती तंत्रज्ञानातील पदव्या घेतल्या आहेत.गुजरात पोलिसांकडून लोकरक्षक दलात पाच वर्षांसाठी एखाद्या व्यक्तीला भरती केले जाते. त्यानंतर त्याला कॉन्स्टेबल म्हणून कायम करून घेण्यात येते. हे पद तिस-या दर्जाचे आहे. (वृत्तसंस्था)
बेरोजगारीचा परिणाम; गुजरातमधील कॉन्स्टेबल आहेत इंजिनीअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:28 PM