नोएडा - दिल्लीनजीक नोएडा येथे हाइड पार्क सोसायटीत मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता ४ वर्षीय चिमुकल्याचा इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून जीव गेला. सकाळच्या वेळी आई वडील आणि बहीण झोपली होती. मुलगा ८ व्या मजल्यावरून खाली पडल्यानंतरही कुटुंबाला जाग आली नव्हती. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले आणि सुरक्षा रक्षकांनी मुलाला हॉस्पिटलला दाखल केले. परंतु दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.
कुटुंब हाइड पार्क सोसायटीच्या ८ व्या मजल्यावर राहायला होते. मृत मुलाचे नाव अक्षत चौहान असून त्याचे वय ४ वर्ष होते. कुटुंबाला ८ वर्षाची एक मुलगीही होती. मुलाला सकाळी उठून घरात फिरण्याची सवय होती. बाल्कनीचा दरवाजा उघडाच होता त्यामुळे तो बाहेर गेला. त्याठिकाणी अर्धी ग्रील असल्याने तिथून तो खाली पडला. जमिनीवर पडल्यानंतर जोरात आवाज आल्याने ग्राऊंड फ्लोअरचे लोक बाहेर आले. त्यानंतर सोसायटीतील अन्य सदस्य आणि सुरक्षा रक्षकही पोहचले. अर्ध्यातासानंतर आम्हाला ही बाब समजली. त्यानंतर मुलाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु तोपर्यंत मुलाचा जीव गेला.
रॅलिंगमध्ये मोठा गॅपज्या बाल्कनीतून मुलगा खाली पडला तेथील रॅलिंग ४.५ फूटाचे आहे. रॅलिंगमध्ये गॅपही जास्त होता. मुलगा या रॅलिंगमधील गॅपमधून खाली पडला असावा असा अंदाज आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सध्या या प्रकरणी कुणीही तक्रार नोंदवली नाही. तरीही पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहे. ही पहिलीच घटना नाही. याआधीही नोएडामध्ये सोसायटीत अशा घटना घडल्या आहेत.